अनोखी दिवाळी

  • 13.9k
  • 4.4k

उद्धव भयवाळ औरंगाबाद अनोखी दिवाळी दरवर्षी दिवाळी जवळ आली की ऋचा आणि मयंक यांच्या आनंदाला उधाण येत असे. दिवाळीसाठी नवे कपडे खरेदी करण्यासंबंधी तसेच फटाके कोणकोणते आणायचे यासंबंधी दोघा बहिणभावामध्ये जोरदार चर्चा चालत असे. यंदा मात्र दिवाळी आठ दिवसांवर येऊन ठेपली तरी दोघे बहिणभाऊ अगदी गप्पगप्प होते. आई आणि बाबा यांनासुद्धा ऋचा आणि मयंक यांच्या अशा वागण्याचे आश्चर्य वाटू लागले. दोघेही मोकळे बोलत नाहीत आणि सदैव विचारमग्न दिसतात हे लक्षात आल्यावर शेवटी एक दिवस बाबांनी दोघांना जवळ बोलावून विचारलेच. "ऋचा, मयंक, दिवाळीची तयारी कुठपर्यंत आली? कपडे कधी घ्यायचे? फटाके कोणकोणते आणायचे?