आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम (दीर्घकथा) - 12

  • 7.3k
  • 2.4k

सगळीकडे गुलाल उधळणं चालू होतं, जोशात मिरवणूक चालू होती, लोकांनी जल्लोष सुरु केला होता, जो माणूस दिसतं होता त्यांच्या अंगाला गुलाल लागला होता, चेहरानचेहरा पार गुलालात रंगलेला वाटत होता, सुमेधला लोकांनी खांदयावर घेतला होता, “एक तर तुम्हाला त्याचं अपूर्प वाटू लागतं तुम्हालां जे अशक्यप्राय वाटत असतं ते आता कुणीतरी सहज करुन दाखवलंले असतं…… आता तुम्ही त्यांच्या पुढे नतमस्तक होणार, आतापर्यंत तो तुमच्यापैकी एक असतो आणि या क्षणापासून तो वेगळा वाटू लागतो, तुम्हाला ही तस व्हायचं असतं पण तुमचे प्रयत्न संपतात, संगळ काही निसटताना दिसतं परिस्थिती आता तुमच्याबाजूनें येईल….. आता येईल…. असं करत एक एक दिवस जमवून ठेवलेला तो आशेचा साठा एका