आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम (दीर्घकथा) - 5

  • 7.4k
  • 2.7k

********** पुन्हा तारीख बावीस डिसेबर (सकाळ): घडयाळात साडेसातच्या पुढे वाजलेत पण आपला साडेसातचा टाईम ठरला होता, “हा भाडखाव कुठे राहलायं” भाऊचा माणूस साईमंदिरासमोर चायच्या टपरीवर बसून मनातल्या मनात बोलत होता, तो भाडखाव म्हणजें तुम्ही, न राहवून त्यांने तुम्ही तिकडे राहत असलेल्या हाटेलला राखण करणा-याला फोन केला आणि त्याला म्हणाला डायरेक्ट रुमवर जाऊन चेक कर, ********** पुन्हा तारीख बावीस डिसेबर (मध्यरात्री): इकडं तुमचं आता भलतचं सुरु झालं होतं, तुम्हच्या डोक्यातून ते जांईट किलरचं प्रकरण जातचं नव्हतं, खरचं होईल का जांईट किलर, लोकांमध्ये असते का ताकद एवढया पावरफुल माणसांला हरवायची, पैसे तर मजबूत चारतोय भाऊं, माणशी हजारचा रेट चालाय, लोकांना बिर्याणी काय….