आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम (दीर्घकथा) - 3

  • 6.4k
  • 2.8k

पात्र क्रंमाक दोन = तुम्ही “सगळं चालयं तसं नाही चालू दयायचं, तुम्हाला चेंज हवाय, कश्यात? एकूण जगण्यात, रोजची बातमी नाय वाचायची तर ती बनायचीय, तुम्ही त्याच तयारीत आहात” प्लॅन सिंपल होता, तो उदया सकाळी आठ वाजता साईबाबाच्या दर्शनाला येईल, तो म्हणजे सुमेध लाटकर, अपक्ष उमेदवार, ज्याने अर्ज मागे घेतला नाही तो… ओके कळालं… तिथं अगोदर साडेसातपासून उभं राहयचं…. कुणी म्हणजे शूटरने, शूटरने म्हणजे तुम्ही, हो तुम्ही…. तुम्हाला एक खून करायचाय, मला माहितीयं तुम्हाला थोडा त्रास होईल यांचा, कधी केला नसेल खून, तुम्हाला रक्त बघूनच फाटते वैगेरे वैगेरे सगळं सांगाल, किंवा तुम्ही कदाचित एखादा खून अगोदर केला ही असाल तर, तर मग,