लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग १)

(23)
  • 17.3k
  • 3
  • 8.5k

’पैश्यासाठी खुन करु शकशील?’, छतावर लावलेल्या आरश्यात शेजारी झोपलेल्या नैनाचा विवस्त्र देह पहाण्यात गुंग झालेल्या जोसेफची तंद्री नैनाच्या त्या विचीत्र प्रश्नाने भंग पावली. अंगावर थंडगार साप पडावा तसा दचकुन उठत तो म्हणाला, “काय??” “हे बघ जोसेफ..”, नैना आपला आवाज स्थिर ठेवत म्हणाली.. “हे असे अजुन किती दिवस चालवायचे? तुला पैसे देऊन देऊन मी कंटाळले आहे. महागड्या गाड्यांची फ्रॅन्चायजी घ्यायचे तुझे स्वप्न सत्यात कधीच उतरणार नाही ये का?” किती दिवस जुगार आणि लॉटरीतुन मिळणार्‍या तुटपुंज्या उत्पन्नाच्या मोहापायी तु माझे कष्टाचे पैसे असे बरबाद करणार आहेस? किती दिवस मी तीच कंटाळवाणी नोकरी करत रहायची? आयुष्यभर नोकरी करुन असे कितीसे पैसे हाती लागणार?