भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग १६

  • 6.1k
  • 1
  • 2.1k

थोडावेळ शांततेत गेला. " तू कुठे निघाली आहेस. कुठे चालला सर्व... " आकाशने पूजाला प्रश्न केला." योगायोग बोललास ना मघाशी... इथेही आहे योगायोग... इथेच आपली ताटातूट झालेली. तोच प्रवास आहे हा.. आठवलं का काही... " आकाशने नकारार्थी मान हलवली. " आपण त्याच देवळात बसून शेवटच्या गप्पा मारल्या होत्या. कदाचित तुला जो अपघात झालेला ना .. त्यात या आठवणी विसरला असशील... पण मला आठवते सर्व. " आकाशला काही आठवलं." स्पष्ट नाही.... पण अंधुक आठवलं , तू बोललीस तेव्हा.... एक मिनिट ... म्हणजे तू ... तीथे निघाली आहेस का .... " आकाश पूजाकडे पाहत म्हणाला." हो ... तो प्रवास नंतर पूर्ण झालाच