* असे कसे होऊ शकते? * अमेय! अकरा वर्षे वय असलेला आणि इयत्ता पाचवीत शिकणारा हुशार मुलगा! शाळेत अभ्यासासोबत तो इतर सर्व उपक्रमांमध्ये अव्वलस्थानी असायचा. त्यादिवशी सायंकाळी तो दिवाणखान्यात सतत अस्वस्थपणे, अगतिकतेने इकडून तिकडे फेऱ्या मारत होता. त्याच्या बाबांची कार्यालयातून यायची वेळ झाली होती. तो त्यांच्या आगमनाची वाट पाहात होता. काय आणणार होते त्याचे बाबा? नवीन कपडे? नवे बुट? चॉकलेट? आईस्क्रीम? की आणखी काही? नाही! यापैकी त्याचे बाबा त्याच्यासाठी काहीही आणणार नव्हते. मग का बरे अमेय त्यांची भेट घेण्यासाठी तळमळत होता. त्यामागचे कारण दुसरे तिसरे कोणतेही नसून बाबांचा भ्रमणध्वनी हे होते. अमेय शाळेतून घरी आल्याबरोबर शाळेत आणि शिकवणी वर्गात सांगितलेला