* पंचनामा माणुसकीचा! * दत्तोपंत दिवाणखान्यात वर्तमानपत्र वाचत होते. त्यांची एक नजर वर्तमानपत्रावर तर दुसरी नजर समोर वाहिन्यांवर चालू असलेल्या बातम्यांवर होती. राजकारणविषयक दिवसभर चालत असलेल्या बातम्या, चर्चा ते न कंटाळता बघत असत. त्यादिवशीही ते बातम्यांचा मनसोक्त आनंद घेत असताना त्यांचा भ्रमणध्वनी खणखणला. त्यावर घर खरेदीविक्री करण्यासाठी, भाडेकरू देण्यासाठी काम करणाऱ्या मध्यस्थाचे नाव पाहून दत्तोपंतांनी भ्रमणध्वनी उचलला."हल्लो, साहेब, बोला. काय म्हणता, मिळाला कुणी किरायेदार?" दत्तोपंतांनी विचारले."तर मग. पंत, आपण एकदा काम हातात घेतले की, होणार म्हणजे होणार. अहो, माझा व्यवसायच आहे तो. पण यावेळी जरा आपले कमिशन वाढून