माकडहत्या

  • 13k
  • 1
  • 3.8k

आज पुन्हा कामावर जायला निघताना उशीर झाला, रेल्वेस्टेशनला पोचलो एकदाचा, मला मुंबईच्या दिशेने जायचं होतं…प्लॅटफॉर्म क्रंमाक एक वर येणारी रेल्वेगाडीसुदधा उशीराने होती. घडयाळात नऊ पस्तीस वाजले होते, अजून नऊ वीसची स्लो लोकल गाडी आली नव्हती, सगळा प्लॅटफॉर्म प्रवाशांनी भरत चालला होता, इतक्यात उदघोषणा झाली प्लॅटफॉर्म क्रंमाक तीनवर जलद लोकल गाडी थोडयाच वेळात येत असल्याची, याशिवाय कोणत्याही क्षणी स्लो लोकल पण क्रंमाक एकवर येणार होती…. काय करावं कळत नव्हतं ?…. फास्ट लोकलने गेलो काय आणि स्लो लोकलने गेलो काय, विशेष काही फरक पडणार नव्हता, शेवटी मग वरच्या पूलावर जाऊन उभा राहलो तिथूंन येणारी रेल्वेगाडी दिसते, म्हटलं जी कुठली पहिली गाडी येईल