नर्मदा परिक्रमा - भाग २

  • 18.9k
  • 9.2k

नर्मदा परिक्रमा भाग २ नर्मदा परिक्रमा म्हणजे नर्मदा नदीला प्रदक्षिणा घालणे. या परिक्रमेची सुरुवात परंपरेनुसार दरवर्षी चातुर्मास संपल्यावर म्हणजेच प्रबोधिनी एकादशी झाल्यावर होते. रामायण,महाभारत तसेच पौराणिक ग्रंथांमधे नर्मदा नदीचे वर्णन आले आहे. या नदीच्या किनारी असलेल्या तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्याने मानवाला पुण्य मिळते अशी श्रद्धा हिंदू धर्मात प्रचलित आहे. ही नदी कुमारिका स्वरूपात आहे अशी धारणा आहे. परिक्रमा धार्मिक अंगाने केली जात असली तरी वाटेत पावलोपावली भेटणारा निसर्ग परिक्रमावासीला अंतर्मुख होण्यापलीकडेही बरंच काही शिकवून जातो. या भूतलावर नर्मदा परिक्रमा ही मोठी प्रदक्षिणा आहे. श्री काशी क्षेत्राची पंचकोस, तर अयोध्या-मथुरा यांची चौऱ्याऐंशी कोस. नैमिपारण्य- जनकपुरी या सर्वाहून मोठी परिक्रमा म्हणजे नर्मदा नदीची