अघटीत - भाग-२

(16)
  • 27.5k
  • 18.4k

अघटीत भाग २ वरदाच्या मनात आले खरेच अगदी धकाधकीचे आयुष्य सुरु होणार आता याचे . नवीन शहर ,नवे लोक नव्या जबाबदार्या आणि वेगवेगळी कामातली नवनवीन आव्हाने !!! या सर्वाची कल्पना तिला पद्मनाभने आधीच देऊन ठेवली होती . आता तो घरासाठी किंवा कुटुंबां साठी फार वेळ देऊ शकणार नव्हता . सर्व काही आता वरदालाच बघावे लागणार होते . तसेही नवरा पोलीस असल्याने पूर्वी पण ड्युटी चोवीस तास होतीच . तरी पण कौटुंबिक आयुष्य चांगले होते . कोल्हापूर सांगली बदल्या झाल्या तरी त्या तिघी सातार्यातून कुठेच गेल्या नाहीत . पद्मनाभ बदलीच्या गावी जाऊन येऊन रहात होता . आता प्रमोशन नंतर त्या सर्वांचे