तृष्णा अजुनही अतृप्त - भाग ४

(28)
  • 30.7k
  • 1
  • 15k

आताच प्रणयात न्हाऊन निघालेल अंग सावरत ती तिच्या मऊशार बेडवर विसावली. बाजुचीच मऊ गुलाबी फुलांची चादर तिने आपल्या देहाभोवती गुंडाळली... बराच वेळ झाला तो कुठेतरी निघून गेला होता.. आताशा तिला त्याला अजिबातच सोडवत नव्हतं. काय काय आणि कसं कसं सुख पेरत होता तो तिच्या आयुष्यात. तिच्या मऊ तांबूस सोनेरी कुरळ्या केसांना अजूनही त्याच्या स्पर्शाचा गंध येत होता. हलक्या नाजूक मोरपीसासारखी फिरणारी त्याची बोटं अजूनही तिच्या मानेवर रेंगाळत होती... नुसत्या त्याच्या स्पर्शाच्या आठवणीने ती रोमांचित झाली... त्याच्या खट्याळ आठवणीने ती स्वतःशीच हसली. हा माणूस असता तर.. हे असं लपून लपून भेटण्यापेक्षा किती मनमुराद जगलो असतो.. नाहीतर तो अनय... शी... बाबांना हाच