नवा अध्याय - 5

  • 26.6k
  • 12.4k

मीनाची ऑफीसची तयारी झाली . आज तिने काहीतरी पक्क मनाशी ठरवल होत . ती आवरून ऑफीसला निघाली . ऑफीस मधे आल्यावर तिचे सगळ्या मैत्रिणीनी स्वागत केले . आणि थोड्यावेळाने कामाला सुरवात झाली . मीनाने ही नवीन जोमाने कामाला सुरवात केली .काम करता करता जेवणाची वेळ कधी आली कळलंच नाही . सगळे हात धुवून जेवणाला बसले . सगळ्यांनी आपापले डबे उघडले . पण सगळ्याना मीनाच्या डब्याची उत्सुकता होती . मीनाने डबा उघडताच खमंग असा वास सुटला . आत वरण , भात , चपाती , कोथिंबीर वडी सगळ्यांनी त्या जेवणाचा फडशा पडला . सगळ्यांनी मीनाला कौतुकाने