जुळले प्रेमाचे नाते - भाग-४८

(22)
  • 10.6k
  • 1
  • 4.5k

सुगंधित उठण लावुन मी बाहेर आले.. ते मानेवर विखुळलेले माझे केस... मी चेहऱ्याला क्रीम लावून घेतली... आईने साडीवर जाईल असा तिचा ब्लाऊज काढून तो माझ्या मापाचा करून ठेवला होता. "आई....!! लवकर ये मला साडी नेसवून दे." मी तर रूमधूनच ओरडले. तशी आई धावपळत आली."काय ग..., काय झालं..??" "आई मला साडी नसव ना...!" मी हातात साडी घेऊन उभी होती."काय ग.. काय झालं प्राजु अशी का ओरडली..??" मागून आजी ही आल्या."काही नाही झालं आई.. हिला साडी नेसवायची होती म्हणून बोलावून घेतलं." आई आता येत माझ्या हातातली साडी घेत बोलली. "काय ग प्राजु तुला साडी नाही नेसता येत..??" आजी हसत आत येत बोलल्या. "काय आजी आम्ही कुठे रोज