जुळले प्रेमाचे नाते - भाग-४४

(23)
  • 10.1k
  • 1
  • 4.4k

आजचा दिवस मी लवकरच उठले. कारण आज मला निशांत सोबत त्याच्या दिवाळी खरेदीसाठी जायचं होतं. फ्रेश होऊन किचनमध्ये गेले तर आईच्या चेहऱ्यावर भलंमोठं प्रश्नचिन्ह होत... "आज सूर्य कोणत्या दिशेने उगवला आहे जे तु कॉलेज नसताना ही लवकर उठलीस प्राजु...???" आई हसत बोलली.. "काय ग आई...! आता काय मी लवकर ही उठु नको का...!!" मी जरा नाराजीने बोलले असता आई माझ्याजवळ आली. "अग बाळा लवकर उठलीस म्हणुन विचारले. कुठे बाहेर जायचं आहे का आज..???" एक स्माईल देत आईने विचारले. "नाही ग आता नाही संध्याकाळी जायचं आहे..!" मी लगेच बोलले आणि नंतर स्वतःची जीभ चावले.. कारण निशांतसोबत जायचं हे आईला माहीत नव्हते.. आई माझ्याकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने