कादंबरी- जिवलगा ... भाग - ११

(17)
  • 23k
  • 16.1k

कादंबरी - जीवलगा ... भाग - ११ वा . ले- अरुण वि.देशपांडे ------------------------------------------------------------------------- मावशींशी बोलून झाल्यावर ,नेहा विचार करू लागली , हे पुढचे तीन महिने, एक अर्थाने आपल्या नव्या आयुष्य-पर्वाची सुरुवात असणार आहे.गेले काही दिवस आपण मावशी आणि काकांच्या सोबत अगदी निर्धास्त होऊन राहत होतो , कसची काळजी नव्हती.आला दिवस मस्त जातो आहे .मधुरिमा या मैत्रिणीच्या सहवासात आपल्यात बदल होण्यास सुरुवात होते आहे , आपण असे का आहोत ? हे आता आपण स्वतः सांगितल्याशिवाय कुणाला कसे कळणार ,? म्हणून सांगतेच आज तुम्हाला .हे जाणून घेतल्यावर तुम्ही नक्कीच म्हणाल -नेहा - यु आर राईट , असेच असायला हवे, जैसा देस वैसा भेस ".एका