जुळले प्रेमाचे नाते - भाग-४२

(19)
  • 10k
  • 1
  • 4.5k

अलार्मने आज जाग केलं पण सुट्टी म्हणून मीच तो बंद करून झोपले.. जाग आली ती आईच्या हाकेने.. कंटाळा करतच उठले.. तसा मोबाईल हातात घेऊन निशांतला गुड मॉर्निंग विश केलं.. थोडा टीपी करून फ्रेश व्हायला गेले.. फ्रेश होऊन बाहेर आले आणि आईसोबत नाश्त्या करायला बसले.. आज छान अशा इडलीचा बेत होता.. पोटभर नाश्ता झाल्यावर आईने लिस्ट सांगितली की, या दिवाळीत काय काय बनवायचं ते.. यावेळी जरा जास्तीच बनवायचं ठरलं होतं कारण आम्हाला ते निशांतच्या घरीही द्यायचं होत.. "मग आई.., कोणत्या पदार्थांपासुन सुरुवात करूया...??" मी हातात मोबाईल घेऊन आईला विचारले... "अग आधी आपल्याला शॉपिंगसाठी जायचं आहे.. कारण रवा, मैदा, साखर, तुप वैगेरे सगळं घेऊन