५) निघाले सासुरा! स्वयंपाक घरात बाई, सरस्वती आणि अलका स्वयंपाकाची तयारी करीत असताना दिवाणखान्यात गप्पांचा फड रंगलेला असताना पंचगिरीच्या भ्रमणध्वनीवर कुलकर्णींचा फोन आला. फोन उचलत पंचगिरी म्हणाले, कुलकर्णीसाहेब, खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन! तुमचेही अभिनंदन! खुश आहात ना? असे करा, रविवारी सकाळी अकरा वाजता आपण सारे कुटुंबीय आमच्या घरी या. आणि हो, आमच्या सूनबाईला आणायला विसरू नका. आता जे काही ठरले आहे ते चारचौघात जाहीर करू. ठीक आहे. नक्की येतो. ठेवू? असे विचारत पंचगिरींनी फोन ठेवला. भाऊजी, पाहुण्यांनी आपल्याला सर्वांना रविवारी बोलावले आहे. देशपांडे, तुम्हीही यायलाच हवं. बरे, झाले. तू निमंत्रण दिले ते. तसे कुलकर्णीही यांना निमंत्रण देतीलच पण एखादेवेळी गडबडीत ते विसरले तर