पायताण

(82)
  • 12k
  • 2.8k

पायताण "अनुबंध" आमच्या कॉलनीतील लायब्ररी. आमच्या इतकी जुनी....पस्तीस वर्षांपुर्वी आम्ही या सहकार नगरात रहायला आलो पाठोपाठ दामलेकाकांची घरघुती लायब्ररी सुरु झाली. भवतालच्या वाचकवर्गामुळे रुजली, वाढली आणि मग स्थिरावली. दामले काकांना गेल्या वर्षी देवाज्ञा झाली. मुलगा-सुन यांनी एक लायब्रेरीयन नेमली आणि दामलेंच्या राज्यात सहजपणे वावरणारा मी आता बिचकत वावरु लागलो. जाड भिंगाचा चश्मा लावलेली जाडसर लायब्रेरियन, तिचा आवाज तिच्या शरीरयष्टीला साजेसा होता....जाडाभरडा. मनातल्या मनात मी तिला मी "जाडे" म्हणायचो.... पुष्कळ वर्षे झाली असतील. माझ्या म्हणण्यावरुन या लायब्ररीच्या बाहेर दामलेंनी बाहेर एक सुचना फलक लावला होता...."पायताण आणि ताण बाहेर ठेवून आत यावे." आज पायताण काढतांना लक्षात आलं की फलकावरील अक्षरं पुसट होत