प्रतिबिंब - 9

  • 6k
  • 2.1k

प्रतिबिंब भाग ९ रोज नव्याने, मृतात्म्यांविषयीचे तिचे ज्ञान वाढतच होते. मृतात्म्यास इतर कोणासमोर यायचे असेल, तर प्रचंड कष्ट पडतात. त्याच व्यक्तीच्या शरीरद्रव्यांचा वापर करत त्याला आपली छबी निर्माण करावी लागते. मृत्यूसमयीची तीव्र भावना, इच्छा, याच त्यांच्या दीर्घकाल अस्तित्वास कारणीभूत ठरतात. जितकी भावना तीव्र, तितका तो अहम, त्या भावनेस चिकटतो. कालानुसार तो अधिकाधिक चिवट बनत जातो. ते मन, त्या तीव्र भावनेस घट्ट धरून ठेवते. कारण त्याचे संपूर्ण अस्तित्व त्यावरच अवलंबून असते. मग न संपणारे नरकयातनेचे हे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी निकराची धडपड सुरू राहते. जाईला मनुष्यस्वभावात आणि यांच्यात अधिकाधिक साम्य दिसू लागले. अहमच्या अस्तित्वाची धडपडच माणसाचे अख्खे आयुष्य व्यापून उरते.