प्रतिबिंब - 7

  • 5.1k
  • 2.3k

प्रतिबिंब भाग ७ एव्हाना शेवंताची दहशत सर्वांनाच बसली होती. कधीकधी कुणाकुणाला ती दिसायची. तिच्यासाठी वाड्यावर आणि गावातही, प्रत्येक शुभकार्यापूर्वी, पौर्णिमा, अमावास्येला, ओटी काढून ठेवण्याची प्रथा पडली होती. आज बेडवर पडल्यापडल्याच चलचित्र सुरू होते. स्टडीमधे जाण्याचीही गरज उरली नाही. जाई विचार करू लागली, शेवंता थोडी शांत झाली असावी. माणसाचा जसा "मी" सुखावतो तसाच तिचाही "मी" सुखावला असेल का, या नव्या मिळणाऱ्या मानामुळे? अचानक तिला तिच्या आजीची आठवण झाली. तिचं बोलणं, जे तेव्हा काही म्हणजे काही कळलं नव्हतं ते आज आठवलंही आणि समजलंही. केव्हातरी, श्राद्धविधी पाहताना जाईने विचारले “आपण हे असे जेवण पणजोबा पणजींसाठी ठेवतो, पण त्यांना हे आवडतं का? दर वर्षी