ज्योतिष शास्र - ग्रहांचे कारकत्व

  • 28.5k
  • 1
  • 15k

गुरू:-- धनु व मीन या राशीत स्वगृही असतो तर कर्क राशीत उचीचा व मकर राशीत नीचीचा असतो.तो आपल्या स्थाना पासून ५.७.व९ या दृष्टीने पाहतो.मांड्या, काळीज,तळपाय.यावर गुरूचा प्रभाव असतो.संतती,वैभव,ज्ञान,परमार्थ,पुण्य कर्म,तसेच,धर्म स्थळे,शाळा, कॉलेज,विश्वविद्यालय,कीर्तनकार,यावर याचाप्रभाव आहे.कर्क,वृश्चिक,मकर मिन या बहू प्रसव राशी या राशीत संततीस अनुकूल असतो.लग्न,द्वितीय,पंचम,नवम,दशम एकादश या स्थानात त्याचे महत्व आहे.गुरूसंपत्ती दायक आहे.त्याच्या द्वितीय किंवा व्ययस्थानी मंगळ नसावा.गुरू तूळ राशीत असेल तर मनुष्य सात्विक असतो.मिथुन,तूळ,कुंभ या राशीत मनुष्य विद्वान व सात्विक होतो.मेष,कर्क,धनु मीन सिंह या राशीत संपत्ती देतो.गुरू चंद्र योगाला अतिशय महत्व आहे .त्रिकोण योग असेल तर परमार्थ,शिक्षण अध्यात्म धार्मिकता असते.लग्न,रवी ,चंद्र यांच्याशी त्रिकोण योग्य संपत्ती दायक असतो लग्न,रवी चंद्र यांच्याशी लाभ करील तर