कादंबरी- जिवलगा ... भाग - ५

(42)
  • 43.8k
  • 2
  • 27.9k

धारावाहिक कादंबरी .. जिवलगा .. भाग -५ वा . ले- अरुण वि.देशपांडे ------------------------------------------------------------ बराच वेळ झाला तरी अजून बस निघत नाहीये ?,काय झाले असावे ? खाली पण खूप काही गोंधळ चालू झाला आहे , मोठ्या मोठ्या आवाजात बोलणे चालू आहे, हे जाणवत होते , काही तरी मोठा प्रोब्लेम नक्कीच झालाय ,खाली उतरून पाहिल्या शिवाय कळणार पण नाही . .नेहा बसच्या खाली उतरली ..तिच्या बस मधले अर्धे अधिक प्रवासी खाली उभे आहेत, हे तिला दिसले, एक मध्यम -वयीन महिला आणि तिच्या सोबत ८-आठ दहा वर्षाचा मुलगा खूप घाबरलेल्या अवस्थेत उभे होते आणि त्यांच्या भवती लोकांच्या गराडा होता. नेहाच्या कानावर एकेक संवाद पडू लागला