प्रतिबिंब - 5

  • 5.5k
  • 2.4k

प्रतिबिंब भाग ५ दुसऱ्या दिवशी यशच्या महत्वाच्या मिटींग्ज होत्या. जाईने त्याला आग्रहाने जायला लावले. मी बेडवरून उठणारच नाही असा निर्वाळाही दिला. दुसऱ्या दिवशी सकाळीच नवरानवरीस देवदर्शनास नेले. साताठ तासांचा प्रवास होता. मंडळी मुक्काम करून तिसऱ्या दिवशी परतणार होती. भाऊसाहेबांनी प्रकृती अस्वास्थ्याचे निमित्त पुढे केले. सगळ्यांना धाडले. त्यात घरात राबणारे, नुकतेच लग्न झालेले, शिवाचे आजा-आजीही होते. तुम्हाला तरी देवदर्शन कधी होणार, असे म्हणत आग्रहाने धाडले. मालकाच्या दानतेने ती दोघे सुखावली. सगळे गेल्यावर भाऊसाहेबांनी शेवंताचे शव ओढत नेत वाड्याच्या छतावरून मागच्या दरीत फेकून दिले. आरशाच्या कपाटाच्या बिजागऱ्या तोडल्या, मग भिवास बोलावून नवे कपाट बनवून त्यावर या आरशाचे दार लावण्यास सांगितले. जुने