पॅरलल जग - Sci fi कथा

  • 15.2k
  • 2
  • 4.9k

“ पॅरलल जग Sci -Fi कथा” बरीच रात्र झाली होती . आज घड्याळाचा काटा दहाच्या पुढे गेला तरी धनश्री आणि तिच्या टीमचे काम अविरत चालूच होते . सगळ्यांची मान कॉम्पुटर मध्ये खुपसलेली होती. कीबोर्डवर चालेल्या बोटांचाच काय तो खट-खट आवाज बे मध्ये येत होता. टार्गेट वेळेत पूर्ण करण्यासाठी एका सुप्रसिद्ध आय.टी कंपनी मधील त्यांची ती सगळी टीम अविरत कामात जुंपली होती. इतक्यात धनश्रीच्या मनगटावरील फिट बँडमध्ये (डिजिटल घड्याळामध्ये) बीप-बीप आवाज येऊन लाल रंगाची LED लाईट लुकलुकू लागलली . लगबगीने तिने फिट बँडचे एक बटन दाबले. तो आवाज बंद झाला. तिने स्वेड शिर्ट्ची टोपी पाठीवर टाकली.कॉम्पुटर लॉक केला आणि खुर्ची मागे