चैत्र चाहूल - भाग १

  • 14k
  • 4.4k

चैत्र चाहूल भाग १ मराठी महिन्यात प्रथम येणारा चैत्र हा वसंताच्या आगमनाचा महिना आहे. ही हिंदू नववर्षाची सुरवात आहे . आसमंत हळूहळू गरम उष्णतेने भरू लागतानाच चैत्रपालवी झाडावर झळाळू लागते. गीतरामायणात रामाच्या जन्माच्या वर्णनाच्या वेळी (रामनवमी चैत्रात असते ) ग.दि.मा. म्हणतात, ''गंधयुक्त तरीही उष्ण वात ते किती...'' गरम असली तरी हवा गंधयुक्त म्हणजेच सुगंधित असते कारण सर्वात सुवासिक असा मोगरा याच काळात फुलतो, बहरतो.यालाच वसंत ऋतू संबोधले जाते .. वसंताचे वर्णन काय करावे? स्वत: भगवंताने आपला विभूतियोग सांगताना ‘गीते’त सांगितले आहे की, ‘अर्जुना! ऋतूंमध्ये मी वसंतऋतू आहे!’ तेव्हा वसंतोत्सव साजरा करणे म्हणजे भगवंताची पूजा करण्यासारखेच आहे! वसंताची चाहूल लागताच कोकिळेचे कूजन