कादंबरी - जिवलगा ... भाग - ३

(112)
  • 57.8k
  • 3
  • 51k

धारावाहिक कादंबरी - जिवलगा .... भाग- ३ रा ------------------------------------------------- सर्वांचा निरोप घेऊन नेहा नोकरीच्या शोधार्थ मावशीच्या शहरी- मुंबईला निघाली खरी, पण, तिच्या मनात प्रचंड धाकुधुक सुरु झालेली होती. वरकरणी ती सगळं काही नॉर्मल आहे असे दाखवत होती , पण मनातून घाबरून गेली होती . तिथे गेल्यावर आधाराला आपली माणसे होती , पण, शेवटी घराच्या बाहेर पडल्यावर तर सगळीकडे एकटीलाच फिरायचे होते , .त्याचे नाही म्हटले तरी तिच्या मनावर टेन्शन आलेले होते . पण, ही अवस्था आपल्या चेहेऱ्यावर दिसू नये याची काळजी घेणे तिला भाग होते, नाहीत तर आई आणि आज्जी दोघी आणखी काळजी करीत बसल्या असत्या . आज निघण्याच्या अगोदर