महाबली हनुमान शक्ती, भक्ती, कला, चातुर्य आणि बुद्धीमत्ता यांनी श्रेष्ठ असूनही प्रभु रामचंद्रांच्या चरणी सदैव लीन रहाणार्या हनुमान जन्माचा इतिहास आणि त्याची काही गुणवैशिष्ट्ये या लेखातून आपण समजून घेणार आहोत. राजा दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी ‘पुत्रकामेष्टी यज्ञ’ केला. तेव्हा यज्ञातून अग्निदेव प्रगट होऊन त्याने दशरथाच्या राण्यांसाठी पायस (खीर) प्रदान केला होता. दशरथाच्या राण्यांप्रमाणेच तपश्चर्या करणार्या हनुमानाच्या आईला अंजनीलाही पायस मिळाले होते आणि त्यामुळेच हनुमानाचा जन्म झाला होता. त्या दिवशी चैत्रपौर्णिमा होती. तो दिवस ‘हनुमान जयंती’ म्हणून साजरा करतात. जन्मतःच हनुमानाने सूर्याला गिळण्यासाठी उड्डाण केले, अशी जी कथा आहे, यातून वायूपुत्र (वायूतत्त्वातून निर्माण झालेला) हनुमान हा सूर्याला (तेजतत्त्वाला) जिंकणारा होता, हे लक्षात