कादंबरी - जिवलगा ..भाग- १ ला

(168)
  • 167.5k
  • 35
  • 142.2k

क्रमशा कादंबरी - जिवलगा भाग-१ ला ----------------------------------------------------- नेहा ऑफिसमधले काम संपवून घराकडे निघाली होती .आजकाल ऑफिस आणि ऑफिसमधले वर्ककल्चर इतके बदलून गेलेले आहे की ,ऑफिस-ड्युटी करतांना सगळे वातावरण सतत तणावाखाली आहे असेच वाटावे अशी परिस्थिती ,नेहाच्याच ऑफिस मध्ये काय, तर सगळीकडे आहे . कारण कुठे ही जावे -तिथे असेच वातावरण पहायला मिळते . आपले ऑफिस आणि आपली ड्युटी याला अपवाद नाहीत , नेहाच्या मनात असेच विचार चालू असायचे . सकाळी ऑफिस मध्ये आले की समोर असण्याऱ्या यंत्रासमोर बसून यंत्रवत वागणाऱ्या माणसांसाठी ,आपण एक यंत्र-मानव बनून "नोकरी" नामक काम करू लागतो . सगळ्यासोबत आपणही या व्यवस्थेचा एक भाग झालोच आहोत.नेहाने स्वतःच्या