अशीही प्रवेश परीक्षा

  • 10.3k
  • 3.5k

°° अशीही प्रवेश परीक्षा! °° सुकन्यापुरी नावाचे एक छोटेसे गाव! परंतु या गावाची कीर्ती तशी देशभर पसरली होती. त्याला कारणही तसेच होते. मागील पंचवीस वर्षांपासून सुकन्यापुरीची ग्रामपंचायत निवडणूक कोणताही वाद, तंटा, भांडण न होता बिनविरोध होत होती. या गावाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे पंचवीस वर्षांपासून या गावावर महिलाराज होते अर्थातच ग्राम पंचायत सदस्य म्हणून नऊ महिलांची बिनविरोध निवड होत असे. या नवनिर्वाचित महिला त्यापैकी सरपंच, उपसरपंच यांची निवड करीत असत. या पंचवीस वर्षात गावाची न भूतो न भविष्यती अशी प्रगती झाली होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे