मी आणि माझी तब्येत

  • 12.1k
  • 4.8k

* मी आणि माझी तब्येत!* 'नमस्कार! मी अमूक तमूक खमके! वय वर्षे पन्नास! मी आजपासून दररोज सायंकाळी सहा वाजता 'सरमिसळ' या लोकप्रिय वाहिनीवरुन स्वतःचेच 'मेडिकल बुलेटीन' अर्थात माझे प्रकृतीपत्र, माझा आरोग्य अहवाल सादर करणार आहे. तुम्ही म्हणाल, तुम्ही असे कोण टिकोजीराव की, तुमचे मेडिकल बुलेटीन दररोज प्रसारित व्हावे आणि काही काम नसल्याप्रमाणे आम्ही ते ऐकावे. बरोबर आहे. वैद्यकीय अहवाल केवळ नेते, थोर समाजसेवक, सिलेब्रेटी, कोणत्या ना कोणत्या कारणाने समाजप्रिय अशा लोकांचे असते. तसे पाहिले तर मी एक साधा कारकून ! माझ्या लेखणीशी प्रामाणिक असणारा, ना कधी लेखणी वा स्वतःचा