कोजागिरी पौर्णिमा आश्विन पौर्णिमेस होणारा प्राचीन लोकोत्सवाला वात्स्यायनाने कौमुदीजागर व वामन पुराणाने दीपदानजागर म्हटले आहे.या दिवशी करायच्या या व्रतात रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी व इंद्र ,बळीराजा यांच्या प्रतिमांची पूजा करतात. हत्तीवर बसलेल्या इंद्र आणि महालक्ष्मीचे पूजन करून उपवास करतात . रात्रीच्या वेळी तुपाचे 101 किंवा यथाशक्ती दिवे प्रज्वलित करून देवघर, बाग, अंगण, तुळस, मुख्य प्रवेशद्वार येथे लावतात.सकाळी स्नान करून इंद्रदेवाचे पूजन करून ब्राह्मणांना तूप-साखर मिश्रित खीर व मिष्टान्न भोजन, दक्षिणा आणि सोन्याचा एक दिवा दिल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात.व मग त्या दोघांना पुष्पांजली समर्पित करतात या दिवशी श्रीसूक्त, लक्ष्मी स्तोत्रचे पाठ करतात. उपोषण, पूजन व जागरण या तीनही अंगांना या