एडिक्शन - 4

  • 9.3k
  • 5.4k

श्रेयसी स्वतःच्या आईला विसरून आता नव्याने जीवन जगू लागली ..आजीने तीच शाळेत नाव टाकलं आणि ती शाळेत जाऊ लागली ..दिवसभर शाळेत असली की तिला बर वाटायचं पण घरी आल्यानंतर वडिलांचा रागीट चेहरा पाहिला की मग मात्र अवसान गळायच ..सायंकाळी स्वयंपाक बनविताना थोडा वेळ मस्ती - मजाक करण्यात जायचा ..त्याच वेळात ती आजीकडून स्वयंपाक देखील शिकू लागली ..हे काही क्षण म्हणजेच तिच्यासाठी काय तो आनंद ..श्रेयसीची आई पळून गेली होती त्याचा संपूर्ण राग तिच्यावर निघायचा शिवाय ती आपल्यापेक्षा लहान मुलासोबत पळून गेल्यामुळे श्रेयसीसुद्धा त्याचीच मुलगी असल्याची शंका त्याच्या मनात निर्माण झाली होती आणि म्हणूनच तो पुन्हा - पुन्हा तिच्याशी वाईट