मित्र my friend - भाग ५

(4.7k)
  • 17k
  • 6.2k

" तुम्ही दोन दिवसापूर्वी ही आल्या होता ना.. " तिथे राहण्याऱ्या एका बाईने प्रियाकडे बघत विचारलं. " हो.. ", " मग तुम्हाला सांगितलं तेव्हाच... केशव नाही राहत आता इथे... गेला तो... " बाई प्रियाकडे रागात बघत म्हणाल्या. " सॉरी काकू... त्रास झाला म्हणून खरंच सॉरी.. पण केशव कुठे गेला हे माहीत आहे का... आणि कधी गेला तो... ", विवेक... " तुम्ही कोण त्याचे... एवढी चौकशी करत आहात ते.. " खोटं तर बोलावंच लागेल.. " आम्ही मित्र आहोत त्याचे.. त्याची आई खूप आजारी आहे ना.. म्हणून आलो त्याला घेऊन जायला.. " , " असं आहे तर... केशव दोन महिन्यापूर्वीच गेला इथून...