तुळशी विवाह कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे. हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे. कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस ही दिवाळी असते. श्रीविष्णू आषाढ शुद्ध एकादशीला शयन करतात व कार्तिक शुद्ध एकादशीला जागे होतात आणि चतुर्मास संपतो असा आहे समज आहे . विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात. हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची रूढी आहे. भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहेत, तुळश ही लक्ष्मी स्वरूप् मानले जाते. हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे.तुळस ही भारताच्या सर्व प्रांतांत व