वारस - भाग 3

(17)
  • 20.3k
  • 14.4k

मंदिरातन निघून विजू घराकडे निघाला,घर म्हणाल तर त्याच स्वतःच अस घर नव्हतंच,आई आणि बाबा लाहनपनीच देवाघरी गेलेले, त्यामुळे त्याच्या काकांकडेच तो रहायचा.काका तसे स्वभावाने चांगले,प्रेमळ,,काकू सुद्धा जीव लावायच्या,एकंदर आई बाबांची कमी कधी जाणवू नये असाच त्यांचा प्रयत्न असायचा.त्याना स्वतःच मुलं नसल्याने त्यांनी विजू आणि चिमणीला स्वतःच्या मुलाप्रमान जपलं होत. विजू सगळं सामान घेऊन भरभर पाऊल टाकत घराकडे आला,तेच ते जून दगड मातीने बनलेलं पण प्रशस्त घर,घराच्या बाहेर एक छानसा गोठा होता,त्यात चार पाच गुर दिसत होती.विजू ने गोठ्यात जाऊन हळुवार पणे गायीवरून हात फिरवायला सुरुवात केली,तेव्हढ्यात त्याच्या पायाशी येऊन मोती रेलू लागला,,विजू ते सगळं बघून फारच खुश झाला.दोन वर्षानंतर गावात