वारस - भाग 1

(28)
  • 35.5k
  • 4
  • 25.8k

"अय गण्या,आर इथं कुठं आणलंस र?तुझ्या चपटी पिण्याच्या नादात आपल्या दोघांच मढ बसण बघ"" भिऊ नको रे तू,काय नाय होणार,मी एकदा आधी पण आलोय इथं,काय भूत बीत नाहीये""पर गावकरी तर म्हणत्यात कि जांगलातल्या वाड्यात जायचं नाही ते,तिथं कुणाला बी जायची परवानगी नाहीये ना""गावातल्या लोकांकड कुठं ध्यान देतू,, कोण बुवा कधी बोलून गेलाय आणि समदे जण त्याच्या बोलण्यावर भरोसा ठेऊन इकडं येत नाही.आणि तस आपण कुठं वाड्यात जाणार हावोत,आपण दूर थांबायचं त्या वाड्यापासून""दूरच थांबायचं हाय तर मग जातूच कशाला?""मग पिणार कुठं र?आपली जुनी जागा त्या त्या नदी काठची तर आता पावसाळा लागल्यानं पाण्यात गेलीये,,अन नवीन सरपंचान तर गावात चार वर्षांपासून दारूबंदी