१९) मी एक अर्धवटराव! सायंकाळ होत होती म्हणजे चार वाजत होते. चहाची वेळही झाली होती. परंतु सौभाग्यवतीचा आराम चालू होता. 'कंटाळलेल्या पुरुषाला फेसबुकचा आधार' याप्रमाणे मी माझा भ्रमणध्वनी उचलून सुरू केला. फेसबुकवर जावे म्हणता भ्रमणध्वनीवर कुणाचा तरी संदेश प्राप्त झाला. शेजारच्या अण्णांनी पाठविलेल्या संदेशात लिहिले होते, 'येता का बाहेर? सहज.' मी लगेच 'आलोच' असे उत्तर पाठवून उठलो. शयनगृहात डोकावले. सौभाग्यवतीचा सप्तसूर लागला होता. मी कपडे चढवून बाहेर पडलो. मला पाहताच अण्णा म्हणाले,"या. या. "मी त्यांच्या दिवाणखान्यातील सोफ्यावर बसत म्हणालो,"अण्णा, वहिनींचा आराम चालू असेल. झोपमोड होईल त्यांची.""अहो, ती घरात आहेच कुठे? ती गेलीय तिच्या बहिणीकडे पाच वाजेपर्यंत येईल. म्हणून