मी एक अर्धवटराव - 13

  • 5.6k
  • 1
  • 2.1k

१३) मी एक अर्धवटराव! ऊतू जाणारे दूध! या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व नवरे मंडळीचे मनापासून अभिनंदन! या परीक्षेला यशस्वीपणे वा अयशस्वीपणे सामोरे गेलेल्या पतीराजांना अजून एका परीक्षेला नेहमीच सामोरे जावे लागते ती म्हणजे भाजी आणणे! काही वेळा तर एक वेळ दूध परवडले पण भाजी खरेदी नको अशी माझ्यासारख्या अनेक नवऱ्यांची स्थिती होते. कितीही पायपीट करून, घासाघीस करून, पाहून- निरखून, हाताची बोटे लालभडक होईपर्यंत सांभाळून आणलेल्या पिशव्या, हाताला, खांद्याला लागलेली कळ हे सारे सोसून भाज्या आणल्या तरीही शाबासकी म्हणून काय मिळते तर बायकोने भाज्यांकडे बघत कडकड मोडलेली बोटे आणि साता जन्माचा उद्धार! 'एक मानव दाखवा मजसी, बायकोने गौरवले