मी एक अर्धवटराव - 8

  • 6.8k
  • 1
  • 2.4k

८) मी एक अर्धवटराव! त्यादिवशी कोणत्या तरी सणाची सुट्टी होती. सण म्हटले की काय खायची चंगळ! त्यात स्वयंपाकात बायकोचा हात कुणी धरणार नाही अशी माझी खात्री! बायकोने केलेल्या स्वयंपाकावर आडवातिडवा हात मारून मी पलंगावर आडवा झालो आणि काही क्षणातच घोरायला लागलो. अर्थात ही बायकोची मल्लीनाथी! कारण मीच काय कुणीही आपण घोरतो हे कबुलच करत नाही. कारण स्वतःचे घोरणे फार कमी लोकांना ऐकू येते. ज्या लोकांना स्वतःचे घोरणे ऐकू येते यापैकी अनेक लोक ते कबुलच करत नाहीत. आता हेच बघा ना मला माझे घोरणे ऐकू न येताही मी ते मान्य करतो पण नेहमी रात्री अपरात्री जिच्या घोरण्यामुळे माझी झोपमोड