खिडकी - १

  • 9.6k
  • 3.4k

खिडकी आज बाबांचा नोकरीचा शेवटचा दिवस. मी आज ऑफिसला सुट्टीच टाकली होती. दुपारच्या जेवणांनतर बाबांच्या ऑफिसात छोटासा सेंड ऑफचा कार्यक्रम आयोजित केला होता. आई, मी, नंदा (माझी बायको) आणि मुले असे सहकुटुंब सहपरिवार आम्ही बाबांना आणायला निघालो होतो. कार्यक्रम अतिशय नेटका झाला, वेळेनुसार सुरु होऊन संपला देखील. बाबांच्या ऑफीसातील शिस्त कार्यक्रमात ठासून जाणवत होती. सहकाऱ्यांची भाषणे झाली, निरोप समारंभ झाला आणि मग आम्ही घरी निघालो. घरीदेखील आईने जैयत तयारी ठेवली होती, बाबांच्या आवडीचे सगळे पदार्थ तयार होते. या सगळ्या लवाजम्यामुळे बाबादेखील खुष होते. दुसऱ्या दिवशी मात्र मी नित्यनियमाने ऑफिसात गेलो, मुले शाळेत गेली, आई आणि नंदा त्यांच्या कामात दंग