सूड ... (भाग ३)

  • 25.6k
  • 1
  • 16.6k

सावंत कुटुंब, चौकोनी कुटुंब… दोन मुली,मम्मी आणि पप्पा. वडिलांचा बिझनेस, त्यात दोन्ही मुली गुंतलेल्या. त्या दोघींमुळेच अजून दोन ठिकाणी नवीन ऑफिस सुरु केलेली. खूप मेहनती होत्या दोघी. मोठी काजल, लहान कोमल. एकत्र शिकलेल्या, शाळा एकच, कॉलेज एकचं. फक्त फरक होता तो स्वभावात. काजल जरा घाबरट स्वभावाची होती. शांत राहायची नेहमी. कोणी काही बोलेल म्हणून कोणालाही उलट बोलायची नाही. कोमल नावाप्रमाणे मुळीच नव्हती. शाळा,कॉलेज दोन्ही ठिकाणी मारामारी करून झालेल्या होत्या तिच्या. अन्याय सहन करायची नाही ती. बिनधास्त स्वभावाची, मनात येईल ते बोलणारी आणि मनात येईल ते करणारी. पण काजलवर खूप प्रेम होतं तिचं. दोघीही business management शिकून ऑफिस जॉईन झालेल्या. दोघी