शर्थ - भाग-४

  • 13k
  • 1
  • 7.4k

भाग ४ - शर्थ (प्रस्तुत ऐतिहासिक कथा शिवरायांच्या अन त्यांच्या वीर मावळ्यांच्या पराक्रमांवर आणि इतिहासातील सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती.) खिंडीत घुसलेल्या चारशे सैनिकांचा धुव्वा उडाला होता. पन्नास एक कसेबसे जीव वाचवून पळून जाऊ लागले. तोवर मावळ्यांनी खिंडीत जखमी अन मेलेल्या मसुदच्या सैनिकांची हत्यारे अन घोडी गोळा करून आणले होते. शे दीडशे घोडी मिळाली होती. धावत जाऊन बाजींनी फुलाजीचा मिठी मारली. "आरं, दादा कुठं व्हता एवढा येळ ." "राजं ..?? राजं, कुठं हाईत??", फुलाजी इकडे तिकडे बघत म्हणाला. "त्यांना खेळणा गडावं फूडं पाठवून दिलंय.