रणकंदन - भाग-३

  • 13.6k
  • 2
  • 8.4k

भाग ३ - रणकंदन (प्रस्तुत ऐतिहासिक कथा शिवरायांच्या अन त्यांच्या वीर मावळ्यांच्या पराक्रमांवर आणि इतिहासातील सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती.) सकाळचा प्रहर चालू झाला होता. इकडे बाजी आपल्या बांदल मावळ्यांना आपली योजना सांगू लागले. कोण दरडीवर चढु लागलं, तर कोण खालील दगडी गोळा करू लागले. पाच पन्नास मावळे दरडीवर चढून मोठं मोठाले दगड गोळा करू लागले. गोफणीसाठी लागणारे लहान दगडही जमा होऊ लागले. काही जण खालील मोठाले दगड दोरीने वर उचलून घेत होते. बघता बघता काही वेळातच मावळ्यांनी मोठ्या अन लहान दगडांचे ढिगारेच्या ढिगारे