दीपावली देशोदेशीची.. घरोघरी आनंदाचे तोरण चढवणारी भारतीय दिवाळी आता विदेशांतही चैतन्याची रुजवात करत आहे. दिवाळी थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या घरापर्यंत पोहोचली आहे, तर इंग्लंडच्या रस्त्यांवरही तिची धूम दिसते. अलीकडे सगळे जगच एक ग्लोबल व्हिलेज झालेले असल्याने प्रत्येक देशातच विविध देशांतील लोक कामधंदा आणि शिक्षण यानिमित्ताने जातात. कालांतराने स्थायिकही होतात. भारतीय लोक त्याला अपवाद नाहीत. लोकांसमवेत त्यांची संस्कृती, भाषा आणि सण हे सगळे आलेच. त्यामुळे आता जगभर पसरलेल्या भारतीयांनी दिवाळी अथवा दीपावली हा सणही जगभर नेला आहे. त्यात विविध वेशभूषा, भारतीय मिष्टान्ने, फराळाचे पदार्थ, सांस्कृतिक कार्यक्रम, रांगोळी, मेंदी, दिव्यांची, इतर आरास आणि शोभेचे दारूकाम असतेच. भारताशेजारच्या, तसेच पुढारलेल्या काही देशांतून तो साजरा करतांना