जुळले प्रेमाचे नाते - भाग-५

(21)
  • 18.7k
  • 10k

निशांतला भेटुन आज मी घरी येऊन जरा फ्रेश होऊन थोडा अभ्यास केला. उद्या बराच वेळ बाहेर जाणार त्यामुळे आजच मी माझा अभ्यास पूर्ण केला. सगळा अभ्यास संपवून बाहेर आले. "आई.., मी काय घेऊन जाऊ उद्या निशांतच्या घरी.??" "त्याला काय आवडत ते बनव." "ए आई मला नाही म्हाहित त्याला काय आवडत... तूच सांग काय बनवु ते....." एक काम कर छान खोबऱ्याच्या वड्या घेऊन जा. त्याला ही आवडतील नक्कीच. मला देखील ते पटलं. मग मी किचनमध्ये जाऊन खोबऱ्याच्या वड्या केल्या. मदतीला आई होती म्हणून लवकर झाल्या. सगळं आवरून मी झोपायला गेले. पण उद्या जायचं म्हणून झोप काही येत नव्हती. सारख आज