माझा सिंह गेला - भाग-३

  • 8k
  • 3.4k

भाग ३ - शिकार (माझा सिंह गेला या ऐतिहासिक कथेचा हा शेवटचा भाग. काही ऐतिहासिक प्रसंग कल्पनाशक्तीची जोड देऊन रंगवलेले आहेत. आपला अनमोल अभिप्राय मिळावा ही अपेक्षा. ) शिवाबराजेंनी धनुुष्यातील बाण भक्षावर ताणला होता. त्यांची नजर फक्त त्या वाघावर खिळली होती. अन अचानक, कोंडाजीला दोरीचा हिसका बसला. झुडपात खसखस वाढू लागली तशी कोंडाजीने दोरी वर ओढायला सुरुवात केली. बहिर्जी वर वर जाऊ लागला. आता, वाघ त्या शेळीवर झडप घालण्याच्या पवित्र्यात असतानाच.. अचानक, शिवबा अन त्यांच्या साथीदारांनी सप सप बाण वाघाच्या दिशेने सोडले. एका बाण वाघाच्या डोक्यावरून गेला.