रहस्य सप्तसुरांच ( भाग १ )

(20)
  • 30.9k
  • 21k

रात्री १२ ची वेळ ..... अभिषेक त्याच्या बाईकवरून एकटाच येत होता. रस्त्यावरून कोणीही नाही.... फक्त आणि फक्त त्याचीच बाईक धावत होती रस्त्यावरून......... त्यात मुसळधार पाऊस कोसळत होता.... रस्त्यावरचे खड्डे चुकवत अभिषेक बाईक चालवत होता. रेनकोट घातलेला असला तरी पूर्णपणे भिजून गेलेला होता.... रस्त्यावरचे दिवे तर आतमध्ये पाणी गेल्याने काही ठिकाणी बंदच होते. अर्ध्या रस्त्यावर प्रकाश तर अर्ध्या रस्ता काळोखात बुडालेला.... वीजही मधेच कडाडत होती... त्यामुळे एक वेगळचं भीतीदायक वातावरण निर्माण झालं होतं.... तरीही अभिषेक घरी यायला निघाला होता.... उशीरच झाला होता त्याला.... कसाबसा अभिषेक त्याच्या एरियात पोहोचला. तिथेही काही वेगळ वातावरण नव्हतं... हवा सुटलेली... त्यात मुसळधार पाऊस ... वीज तर