बहिर्जी नाईक आणि आग्र्याहून सुटका - २

(16)
  • 43.4k
  • 29.4k

"मिर्झा" म्हणजे राजपुत्र अकबर बादशहाने त्याचा सेनापती मानसिंग याला तो मान दिला होता...त्यांची कामगिरी तशीच होती...अशा शूर राजपूत कछवाह वंशात जन्माला आलेले मिर्झाराजे जयसिंग आपल्या वयाच्या आठव्या वर्षी जहागीरच्या सेवेत रुजू झाले. औरंगजेबाला गादीवर बसवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. शहाजहानच्या काळात शहजादा शहाशुजाबरोबर ते अफगाणिस्तानच्या मोहिमेवर सहभागी झाले होते...त्यांच्या उर्मट तलवारीने खूप मोठा पराक्रम गाजवला होता..काबुल, कंदाहारचा परिसर जिंकून मोगलाईला जोडण्यात त्यांचा मोठा वाटा होता.. मिर्झाराजे जयसिंग उर्दु, तुर्की आणि फारसी भाषांचे उत्तम जाणकार होते...मोगली शिष्टाचार,दरबारी रीतिरिवाज यात ते पारंगत होते...औरंगजेबाने त्या काळी फक्त मोगली राजपुत्रांना देण्यात येणार मन त्यांना दिला होता...त्यात उच्च प्रतीचा घोड़ा, हत्ती, मोत्यांची माळ असे