राष्ट्रध्वजाचे पत्र

  • 10.2k
  • 1
  • 3.1k

* राष्ट्रध्वजाचे पत्र! *प्रति,प्राणप्रिय राष्ट्रभक्तांनो,जयहिंद। किती छान वाटतेय तुमच्याशी संवाद साधताना. किती नशिबवान आहे ना मी. तुम्ही माझी राष्ट्रीय प्रतीक म्हणून निवड केली तेव्हा खूप खूप आनंदलो होतो मी. फार मोठा सन्मान आहे हा माझा! तुम्ही निवडलेले तीन रंग माझे सौंदर्य खुलवतात. माझ्या छातीवर असलेले अशोक चक्र माझा फार मोठा गौरव आहे असे मी मानतो. हे तुम्ही मला प्रदान केलेले रुप तुम्हाला तुमच्या जीवाहून प्रिय आहे हे मला माहिती आहे. किती प्रेम करता तुम्ही सारे माझ्यावर! केवढा अभिमान आहे, तुम्हा सर्वांना